नभात घन भरून आले
मनी उठले काहूर ओले
तना-मनातून चित्त भिजले
आठवणीत सर्वस्व न्हाले ।
अश्याच पाउस वादळ वाटेत
तुझ्याच हातात होता हा हात
कुठे बिनसली प्रबळ ती साथ?
कुठल्या गर्तेत हरवली वाट ।
जन्म जन्मांचा साथ आपुला
काही क्शणांचा सोबती राहीला
शरीरा मधील प्राण तेवला
अशीच कळ लागली जिवाला।
कुठे संपले सप्तक स्वर...
कुठे विसावले मंद्र नी तार....
कुठे जाहला आर्त मल्हार....
का लावलीस मना हूरहूर.....
Thursday, September 4, 2008
Subscribe to:
Posts (Atom)