Monday, December 14, 2009

कळत नकळत

कळत नकळत काळ सरुन जातो, आणि बरिचशी नाती काळाच्या पडद्याआड दडी घेतात. काही काळासाठी का होइना ती दिसेनाशी होतात, आणि मग मनात फक्त हूरहूर राहाते.

रोजच्या बिझी शेड्यूल मधून सर्वांन्ना हक्काचा मिळणारा निवांत वेळ म्हणजे,झोपण्या आधीचा वेळ! त्या वेळात आपल्याला काय काय करायचे आहे आणि काय काय करायचे राहिले ते सारे काही आठवते, मग नकळत आपण त्या गोश्टींची मनाशी खूणगाठ बांधतो आणि दिवस भर वणवण करुन थकलेला देह गादीवर टाकतो. मनाशी बांधलेल्या या खूणगाठीही स्म्रूतीच्या पडद्या आड कधी जातात ते कळत नाही, आणि मग अचानक एक दिवस एखादी बातमी येते.... मनातून आंतर-बाह्य हलल्या सारखे होते. त्याच वेळी जर ते केले असते तर?? असे प्रश्न पडू लागतात पण तोवर खूपच उशीर झालेला असतो. ज्या व्यक्तीशी आपण आज बोलू , उद्या फोन करु , परवा पत्र पाठवू अश्या खूणगाठी बांधलेल्या असतात त्या नियतीच्या एका झटक्याने पुर्णपणे तूटून पडतात, निश्क्रीय आणि निरर्थक होतात. खूणगाठीतून जिवंत राहिलेली हवी हवीशी वाटणारी, तरी वेळेअभावी दूर राहिलेली ती व्यक्ती परत कधीच दीसणार नाही याची बोचरी जाणीव चिमटा काढून जाते…. ते मनात आले होते तेव्हाच केले असते तर?? फक्त एक दहा आकड्यांचा नंबर तर डायल करायचा होता! फक्त अर्धा तासच कंसेशन घ्यावे लागणार होते! फार फार तर एक दिवस रजा काढायला लागणार होती! त्या वेळी मोठी वाटणारी ही सगळी कारणे आता मात्र फार शुल्लक वाटू लागतात. आपण खरच ही कारणे उभी करत होतो का ती खरच होती?? स्वत:चीच चीड येउ लागते. जरी आज पर्यंत त्यांना फोन नाही करू शकलो, त्यांच्याकडे जाउ नाही शकलो, तरी त्या व्यक्ती या खूणगाठींत बान्धून राहील्या होत्याच मनात! पण त्या अश्या जागी होत्या जिथे कोणीच त्यांना पाहू शकले नाही. लोक मात्र तोंड उघडून वाटेल ते बोलले, इतके जवळचे सोयरे तरी साध्या अंतयात्रेलाही आले नाहीत! त्यांना कसा कळणार या अपराधी मनाचा सल? ज्या व्यक्तीच्या खूणगाठी घेउन वर्श वर्श नांदलो, त्याचाच निपचीत चेहरा कसा पाहावेल सांगा? कदाचीत तो पाहील्यावर खूप बोलावेसे वाटले तर?? तर त्यांच्या चेहेर्यावरचे भाव पाहाण्यासाठी मन आसुसेल, आणि ते भाव कायमचे विरून गेले आहेत या सत्य परीस्थीतीचा धक्का सहन नाही करू शकलो तर???? त्यांच्या भावनांचा शेवटचा अपडेट ही इतका जूना झाला आहे की पूढे ती व्यक्ती एक निश्चल प्रेत म्हणूनच मनात राहून गेली तर???? या भावनांच्या भेंडोळ्यातून अचानक गाड्यांचा हॊर्न कानावर येतो. सिग्नल सुटलेला असतो आणी आपणच पुढच्या रांगेत असतो, आपल्यासारखेच घायकूतीला आलेले बरेच जीव दात ओठ खात आपल्यावर हॊर्न स्वरूपी ओरडत असतात, तंद्री तुटते, नकळत गाडीचे व्हिल हाताने वळवले जाते, डोळ्यासमोरील त्या व्यक्तीच्या आठवणी जाउन त्याची जागा दारावर ठेवलेल्या मस्टर ने घेतलेली असते, बॊस आता आपल्यावर कसा खेकसणार याची पूनर उजळणी चालू झालेली असते. घड्याळ मॅरथॊन धावत असते,कोप्रर्या वरचा पांडू आपल्यावरच डोले लावून बसलेला असतो. नेहमी ओघाने येणार्या काही जबाबदार्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात, आज त्यांचा किंचीत त्रास होत असतो पण नकळत आपण त्याला सोडचीठ्ठी देतो. आज रात्री झोपायच्या आधी काही आठवले नाही तरी गेलेला वाइट दिवस नक्की आठवणार अशी खुण मनाशी पटते. ’अरे विजेचे बिल भरायचे रहीले आहे!’ , ’अरे, मोबाइल रिचार्ज करायचाय !’ , ’घरी जाताना आज भाजी नाही नेली तर खरच घरात जेवण होनार नाही !’ , मी किती निश्काळजी आहे? महत्वाच्या गोश्टी अश्या कश्या विस्मरणात जातात? आपण मनाशी या सगळ्या गोश्टी उरकण्याची खुणगाठ बांधतो. मनातील एक खुणगाठ मात्र कायमची सुट्लेली असते , कळत नकळत….