Sunday, January 17, 2010
Lost
Tuesday, January 12, 2010
कातरवेळ
डोळ्यासमोर सारी कामे नाचत होती, पण आज मन कुठेतरी दूसरीकडेच होते. कॊंप्युटर वर सतत काम करुन पाठ आखडली होती, आणी शेवटचे अन्न ग्रहण कधी केले ह्याचा काही हिशोबच उरला नव्हता. तरीही डोळे स्क्रीन सोडत नव्हते. कातरवेळ, तिन्हीसांज अस जे काय म्हणतात ती झाली होती, पण तीथे बघायला वेळ कोणाला होता? ऒफीसातले सगळे निघून गेले होते. मला क्शणभर फार एकाकी वटलं. आल्या पावली मी त्या एकाकीपणाला हकलवलं आणी पुन्हा एक्सेल शीट मध्ये डोक घातलं. पण हळू हळू डोळेही खुपच झोंबायला लागले, आता ब्रेक घेणं अपरीहार्य होतं ! डोळ्यांवर पाणी मारण्या साठि मी डेस्क सोडला
गार पाण्याच्या हबक्याने माझ्या डोळ्यावरची कामाची गुंगी उतरली. पुन्हा कॊंप्युटर वर बसण्याची इच्छा होइना. ऒफीसात कुणीच नसले तर जाता जात पिउन दोन खिडक्या उघडून जातो. त्याला माझी उशीरा पर्यंत काम करण्याची सवय परीचयाची आहे. ऒफिसातील बाकी सारे जितक्या लवकर जाता येइल तितके आनंदात असतात, पण मला कसलीच घाइ नसते.
माझी पावलं नकळत खीडकी कडे वळली , खिडकीच्या बाजुला उभ्या कॊफी मशीनला एक कॊफी बनवायला सांगून त्याच्या प्रतीक्शेत मी खिडकी जवळ गेलो. बाहेरच आभाळ तांबूसल होतं, काळ्या ढगांच्या किनारीला सोनवर्ख फुटला होता, आभाळात केशर उधळलं होतं कोणीतरी, मनात आलेल्या या कवीकल्पनेने मला गालातल्या गालात हसु आलं, थोड वेडगळ वाटलं. मनातले विचार झटकत मी पुन्हा कॊफी मशीन कडे वळलो, तेव्हाच वार्याची एक झूळूक आली, तिच्या आर्द्र थंडाव्यात गरम कॊफीचा गंध मिसळला आणी त्या सोबत आली तिची आठवण….
बॅंड स्टॅड च्या कॅफे मध्ये समुद्रावरुन घोघावत येणारा वरा आणी त्या बरोबर दरवळणारा टेबलावर ठेवलेल्या कॊफीचा गंध, अगदी असाच! आजच्या सारखा…. पण आज त्यात तिच्या हलक्या स्मीताचा दरवळ नव्हता…. मन विशण्ण झालं…. अंतरात एक अजाण काहूर उठलं, ज्याला उत्तरही नव्हतं आणी उपायही सापडणार नव्हता. हीच हूरहूर रोज एक्सेल शीट्स मध्ये डोक घालून नजरेआड करण्याचा प्रयत्न करत आलो, पण आज मात्र मला त्या कातरवेळेने गाठलं होतं…..