वर्शानुवर्श या आशेवर दुनिया टिकली. मोठ्यातल्या मोठ्या धक्यातुनही पुन्हा मने सांधाणारे आशा हे एकच औषध आहे असे सगळ्या जगाने मान्य केले, परंतू एका आशेची पुर्तता झाली नाही तरी माणूस नव्या आशा ठेवत गेला आणी म्हणूनच आज पर्यंत टिकला! झालेल्या निराशेचे औषध एक नविन आशा! पण या निराशेने माणूस आशा न करण्यास कधीच धजला नाही! कारण निराशा पत्करणे म्हणजे आज पर्यंत निर्माण केलेल्या आशेचा डोलारा कोसळणार! मग जगाचे रहाट गाडगे पुढे कसे जाणार?
सारासार विचार केला तर आशावाद हा आजच्या जगाच्या वर्तमानाचा एकमेव मुलाधार आहे असे दिसून येइल, आणि कदाचीत भविष्याचा सुद्धा! उद्याची सोडाच परंतू पुढच्या काही तासांत जिवंत राहण्याची शाश्वती नसताना पेंशन प्लॅन विकत घेणारा आशावाद, ग्लोबल वॊर्मींगचे चटके बसत असतानाही, ’चलता है’ म्हणत जोरदार फटाके वाजवणारा आशावाद, घर चालवायला खिशात दमडा उरलेला नसताना मुले जन्माला घालणारा अशावाद, हे असे वर्तमानातील आशावाद भविष्यातल्या निराशेची पाळमुळं घेउनच जन्माला येताय्त. पण निराशे कडे पाठ करून आम्ही पुन्हा याचे परिणाम भोगताना नव्याने आशावाद बाळगतो!
सुखस्वप्न म्हणजे आशा, ज्याची पुर्ण होतात त्याला पुन्हा आशा ठेवण्याचा पुर्ण अधीकार आहे! परंतू ज्याची पुर्ण होत नाहीत त्याच्यासाठी पुढचं आयुश्य काढण्याची कुबडी बनतो आशावाद! तरी त्या कुबडीवर रेलून तो नव्याने पाउल पुढे टाकतो आणी नव्याने आशा धरतो, आणि कधिच कुणाला हे जाणवून देत नाही की आभाळाला स्पर्शण्याची आशा जर धरतीने केली तर ती आशा नसून निराशेची सुरूवात असते. इसी लिये तो उम्मीद पे दुनीया कायम है!