Tuesday, June 3, 2008

F S I

काव काव करत कवळा बसला घराच्या खीडकी वर,
आत बघून मला म्हणतो राव तुम्हाला सुंदर घर!

आम्ही आपले उन्हा तान्हात भटकत फीरतो दारो दार,
पावसाळा येण्या आधी काड्या शोधतो वारंवार.

तुमच काय बर आहे बुवा तुमच्या डोक्यावर छप्पर
पाउस पडो वारा सुटो तरी तुमच्या तंगड्या वर !

आम्ही बीचारे तंगड्या भाजत फीरत असतो उन्हा तन्हात
नशीब आमचच खट्टू , तुम्हाला घर मीळतं बाजारात.

आहो भाउ ऐकलत का ह्या हजार स्क्वेअरफीटाच्या घरात,
कशाला देता हकलवून जर आलो अर्ध्या मुर्ध्या स्क्वेअरफीटात?

तुम्हा साल्या माणसांची दानतच गेलीय वीकत
काय जाणार आहे जर दीलीत जागा घरट्या साठी फुकट?

शांत पणे ऐकत होतो गंभीर पणे उठत म्हटल
कावळे बुवा तुमचं मला बघा बरीक पटलं!

देउ केला तुम्हाला मी अर्धा स्क्वेअरफीट
पण सांगू का कींमत याची येइल तुम्हाला येइल तुम्हाला फीट.

पहीला टाका advance ह्जार भराचा , मग तुम्चा E M I दोन हजाराचा
एकूण मीळुन जागा पडेल आठ हजाराला, असतील इतके पैसे तर आणतो एजंटला.

नसतील पैसे खीशात तर लवकरच नीघा
दादरचा वीचार सोडा, म्हाडात जागा बघा!