नाही येत मला दडपता आलेली तुझी आठवण,
अन विसरून जाता तुझ्या सारख सारं काही पटकन
मग म्हणूदेत मला ते कमकुवत मनाने
जागते ठेवते मी, प्रेम निखार्यात धिराने.
वाळू टाकून विझवू पाहात नाही मी मन वणवा तव आठवणींचा
विझतो विखार माझ्या धूमसत्या तारुण्याचा.
जाउदे... तसे ही आता, ही आग का असावी ?
मनात पेटला वणवा अन आस का विझावी ?????
Tuesday, March 24, 2009
Monday, March 2, 2009
Tuesday, January 27, 2009
अंत
ह्रुदयातील हे रूधीर जाहले मुक्त
सुटले शोधण्या मार्ग आसक्त
भळभळून मिळाले जीवनास
विसरून त्यास ते रक्त
जखनेतून झाला मोकळा विशारी लाव्हा
लपलपून पिती त्यास सागरी जिव्हा
खार झोम्बतो खाचेवर शरीराच्या
अन डाच मागतो थेट ठाव ह्रुदयाचा
किती दुधारी घाव दीलेस तु ह्रुदया
पण एकच गेला दुभंगून हि काया
या रक्त सागरी देह आहूती देउन
मी तुझ्याच अंशा मध्ये बुडून जाइन
संपेल रूधीर आणी सागर श्वास नेइल
तरी तुझ्या आठवणी ह्रुदयात जिवंत असतील
विशारी रक्त वाहूनी गेले जरी शरिरातील सारे
तरी सागर त्यांना ओलावत ठेलील
रूधीर वाहूनी गेले जरी सारे
ह्रुदयात तुला जिवन जागते ठेवील............

Thursday, December 4, 2008
माणूस
मुंगीलाही अभय नाही, तीला खातो कोळी.
कोळ्यालाही अभय नाही, त्याला खाई पाल.
पलीलाही अभय नाही, पाल खाई मांजर.
मांजरालाही अभय नाही, तीला घाबरवी कुत्रा.
कुत्र्यालाही अभय नाही, त्याचा मालक माणूस.
सर्वां वरती असलेल्या या मानवास कसली भिती?
तरीही माणूस निर्भय नाही, तो घाबरवी एकमेकांस.

Thursday, September 4, 2008
हूरहूर
नभात घन भरून आले
मनी उठले काहूर ओले
तना-मनातून चित्त भिजले
आठवणीत सर्वस्व न्हाले ।
अश्याच पाउस वादळ वाटेत
तुझ्याच हातात होता हा हात
कुठे बिनसली प्रबळ ती साथ?
कुठल्या गर्तेत हरवली वाट ।
जन्म जन्मांचा साथ आपुला
काही क्शणांचा सोबती राहीला
शरीरा मधील प्राण तेवला
अशीच कळ लागली जिवाला।
कुठे संपले सप्तक स्वर...
कुठे विसावले मंद्र नी तार....
कुठे जाहला आर्त मल्हार....
का लावलीस मना हूरहूर.....
मनी उठले काहूर ओले
तना-मनातून चित्त भिजले
आठवणीत सर्वस्व न्हाले ।
अश्याच पाउस वादळ वाटेत
तुझ्याच हातात होता हा हात
कुठे बिनसली प्रबळ ती साथ?
कुठल्या गर्तेत हरवली वाट ।
जन्म जन्मांचा साथ आपुला
काही क्शणांचा सोबती राहीला
शरीरा मधील प्राण तेवला
अशीच कळ लागली जिवाला।
कुठे संपले सप्तक स्वर...
कुठे विसावले मंद्र नी तार....
कुठे जाहला आर्त मल्हार....
का लावलीस मना हूरहूर.....
Tuesday, June 3, 2008
F S I
काव काव करत कवळा बसला घराच्या खीडकी वर,
आत बघून मला म्हणतो राव तुम्हाला सुंदर घर!
आम्ही आपले उन्हा तान्हात भटकत फीरतो दारो दार,
पावसाळा येण्या आधी काड्या शोधतो वारंवार.
तुमच काय बर आहे बुवा तुमच्या डोक्यावर छप्पर
पाउस पडो वारा सुटो तरी तुमच्या तंगड्या वर !
आम्ही बीचारे तंगड्या भाजत फीरत असतो उन्हा तन्हात
नशीब आमचच खट्टू , तुम्हाला घर मीळतं बाजारात.
आहो भाउ ऐकलत का ह्या हजार स्क्वेअरफीटाच्या घरात,
कशाला देता हकलवून जर आलो अर्ध्या मुर्ध्या स्क्वेअरफीटात?
तुम्हा साल्या माणसांची दानतच गेलीय वीकत
काय जाणार आहे जर दीलीत जागा घरट्या साठी फुकट?
शांत पणे ऐकत होतो गंभीर पणे उठत म्हटल
कावळे बुवा तुमचं मला बघा बरीक पटलं!
देउ केला तुम्हाला मी अर्धा स्क्वेअरफीट
पण सांगू का कींमत याची येइल तुम्हाला येइल तुम्हाला फीट.
पहीला टाका advance ह्जार भराचा , मग तुम्चा E M I दोन हजाराचा
एकूण मीळुन जागा पडेल आठ हजाराला, असतील इतके पैसे तर आणतो एजंटला.
नसतील पैसे खीशात तर लवकरच नीघा
दादरचा वीचार सोडा, म्हाडात जागा बघा!

Tuesday, April 22, 2008
धरल तर चावतय ..............
मोठे मोठे प्रश्न! त्यातला सगळ्यात मोठा म्हणजे पैसा, नेमका तोच माझ्याकडे कमी असतो, कधी कधी वाटते आपण आहे नाही ते सारे याच्यासाठी वीकून टाकावे ! अणी मग लक्शात येते, की अरेच्या आपण तेच तर करतोय! माझ्याकडे ऐक डोके आहे ते तर मी रोज वीकत असते कधी वीचारांच्या स्वरूपात तर कधी कल्पनान्च्या. माझे दोन हात अहोरात्र काम करत असतात ते हे पैश्यां साठीच आणी माझे पाय ते ही सर्व पायपीट करतात ते ह्या पैश्यांसाठीच . मग अता माझ्या कड़े वीकायला काय शील्लक राहते? आणी इतके सगळे करुनही पुन्हा हातात काहीच उरत नाही! याचेच मला फार वैमनस्य येते. मग वाटते सगळे व्यर्थ आहे . सोडून देउया काम करणे.
एक दीवस मनाशी नीश्चय करून मी सुट्टी घेतली, एक- दोन नाही चांगल्या महीन्या भाराची सुट्टी घेतली. ज्या व्यक्तींचा मझ्यावर फार परीणाम होतो अश्या व्यक्तींपासून दूर रहायाचे ठरवले . या काळात काम घेणे कटाक्शाने टालायाचे ठरवले आणी आत्मपरीक्षनाला अवलंब केला.
काही दीवस आनंदत गेले. पहीले दहा एक दीवस काहीच वीशेष घडले नाही, परन्तु त्यानंतर माझ्या अर्थ रेशेला नीवांत बसवेना! मी तीच्या इशार्यावर पळत नाही म्हणजे काय? प्रयत्नही करत नाही! ही तर हद्दच झाली! मग मला फ़ोन येऊ लागले, कसले काय, कामाचे ! कधी नव्हे ती कामं माझ्या पायाशी लोळण घालू लागली, आणी मी! तपस्वी मुनींप्रमाणे सर्वांना एकमेव उत्तर देत होते, नाही!
प्रत्येकच गोश्टीत अस म्हणतात की धरलं तर चावतय आणी सोडलं तर पळतय पण मी म्हणते सोडले की पळत आणी आपण पुन्हा त्याच्या पाठी गेलो नाही की गुमान शेपुट घालून पाठी पाठी येत तेच आपले नशीब.

Subscribe to:
Posts (Atom)