Wednesday, April 2, 2008

अंतरंगाचे कान

मला कधी कधी वाटायला लागते की माझे कान कायमचे बंद होणार की काय? कीवा माझ्या डोक्यमध्ये कळ येउन माझे डोके वीचार करायचे बंद होउन जाइल की काय? माझ्या डोकेदुखीने अचानक डोळ्याला दीसणे बंद होईल की काय ?
मी रात्र रात्र या वीचाराने झोपू शकत नाही। डोळ्याला डोळा लागला की आतून कोणीतरी कींचाळल्याचा भास होतो आणी मी दचकून उठते. जर चुकून झोप लाग्लीच तर कोणीतरी सतत घाबर्लेला एक घाणेरड्या बंद खोलीत सडणारा जीव मला खुणावत असतो , ज्याचा सतत कोणीतरी पाठलाग करत असते, कींवा तो सतत एकटा असतो, पण प्रणांतीक घाबर्लेला असतो! तो मला घाबरवुन सोडतो ! मग माझी कमालीची घुसमट होते, मी आवेगाने उठून बसते। ग्लानी येत्च असते परन्तु झोपण्याची भीती वाटते। पुन्हा प्रयत्न केला तर ते भयाण तांडव पुन्हा सुरु होईल याची भीती! रात्रं दीवस तणावात घालवुनही सर्वान समोर मात्र माझा चेहरा कायम हसत्मुख असतो । मला माझा ताण लापव्ता येतो। अलीकडे तर मला राग लोभ जाणवेनासा झाला आहे! हसर्या चेहेर्यच्या पाठचे माझे डोके कायम कोणीतरी कुरतडत आहे अशी सतत जाणीव होत राहते।
माझे शब्द माझ्यापासून दूर गेले आहेत। माझ्या भावना कृत्रीम झाल्या आहेत, मलाच माझे दाख्वाय्चे दात् आणी चावाय्चे दात वेगळे करता येत नाहीत! भावना मुक्या होउन मनाच्या खोल कोपर्यात बंदीस्त झाल्या आहेत आणी रोज आक्रंदत आहेत!माज्या पर्यंत पोहोचू पाहत आहेत! परन्तु मी माझे कान बंद करून घेतलेले आहेत। या सार्याचा परीणाम मला सरळ दीसत असूनही मी त्याच्या कड़े काना डोळा करते आहे! आणी सग्ल्या आंतरीक भावनांना दडपून टाकण्यासाठी मी मनातील वीचारांची वाटच बंद केली आहे! मी वीचार करणे सोडून दीले आहे, कदाचीत म्हणूनच माझ्या मनात वीचार आला की मी तो पळवुन कसा लावायचा या बद्दलच वीचार करते! आणी वीचारांती सर्व वीचार बंद करते।
मग मी का दोष द्यावा माझ्या इंद्रीयांना ? आणी का घबरावे त्यांच्या असहकाराला ? शेवटी ते ही मला तेच देताय्त जे मी त्यांच्या बरोबर करत आहे! ......... परस्परांचे न ऐकणे!

4 comments:

saurabh V said...

@ शाल्मली,

पोस्ट ची शेवटची ओळ एकदम "punch-line" आहे. चांगला झालाय पोस्ट. मराठी लिहायची सवय झाली कि र्‍हस्व-दिर्घ आणि जोडाक्षरांच्या चुका कमी होत जातील. एकुण पोस्ट चांगला आहे.

saurabh V said...

आता महत्वाचा मुद्दा!

हे सगळं खरच अनुभवतेस? कि ब्लॉग म्हणुन लिहिलं आहेस?
प्रश्नाचा चुकिचा अर्थ काढु नकोस, पण हे तुझे रोजचे अनुभव असतील तर दोन गोष्टी - विचार करणं बंद करु नकोस, त्याने त्रास खुप वाढतो आणि घुसमट, दडपलेले विचार तुझा कुठलाहि प्रॉब्लेम दुप्पट वाढवतात.

विचारांना थांबवु नकोस, त्यांना तु थांबवुहि शकत नाहिस. तु त्यांना जितकं नाहि-नाहि म्हणशील तितके ते bounce back होतात.

त्यांना इतकं मोकळ सोड कि शेवटी त्यांनाच कंटाळा आला पाहिजे. किंवा एखाद्या कामात-कलेत स्वत:ला इतकि गुंतव कि विचार करायलाच वेळ मिळायला नको. शरीराला इतकं थकवायचं कि मनाला शरीरावर ताबाच मिळणार नाहि.

me said...

are hraswa dirghachya cuka kalat hotya pan mala ulati ekarachi welanti pahawat nahi mhanun sagli kade dirgh welanti theun thewli aahe.sarwanche blogs me wachle pan ya problems mule te wachayla khup kathin jatat tyamule me ha wachayla soppa rahawa mhanun khup modify kela aahe.

Unknown said...

Welcome to the real world...