Thursday, December 4, 2008

माणूस

मुंगीलाही अभय नाही, तीला खातो कोळी.

कोळ्यालाही अभय नाही, त्याला खाई पाल.

पलीलाही अभय नाही, पाल खाई मांजर.

मांजरालाही अभय नाही, तीला घाबरवी कुत्रा.

कुत्र्यालाही अभय नाही, त्याचा मालक माणूस.

सर्वां वरती असलेल्या या मानवास कसली भिती?

तरीही माणूस निर्भय नाही, तो घाबरवी एकमेकांस.