Tuesday, January 27, 2009

अंत

ह्रुदयातील हे रूधीर जाहले मुक्त
सुटले शोधण्या मार्ग आसक्त
भळभळून मिळाले जीवनास
विसरून त्यास ते रक्त

जखनेतून झाला मोकळा विशारी लाव्हा
लपलपून पिती त्यास सागरी जिव्हा

खार झोम्बतो खाचेवर शरीराच्या
अन डाच मागतो थेट ठाव ह्रुदयाचा

किती दुधारी घाव दीलेस तु ह्रुदया
पण एकच गेला दुभंगून हि काया

या रक्त सागरी देह आहूती देउन
मी तुझ्याच अंशा मध्ये बुडून जाइन

संपेल रूधीर आणी सागर श्वास नेइल
तरी तुझ्या आठवणी ह्रुदयात जिवंत असतील
विशारी रक्त वाहूनी गेले जरी शरिरातील सारे
तरी सागर त्यांना ओलावत ठेलील

रूधीर वाहूनी गेले जरी सारे
ह्रुदयात तुला जिवन जागते ठेवील............