Tuesday, March 24, 2009

आठवण

नाही येत मला दडपता आलेली तुझी आठवण,
अन विसरून जाता तुझ्या सारख सारं काही पटकन

मग म्हणूदेत मला ते कमकुवत मनाने
जागते ठेवते मी, प्रेम निखार्यात धिराने.

वाळू टाकून विझवू पाहात नाही मी मन वणवा तव आठवणींचा
विझतो विखार माझ्या धूमसत्या तारुण्याचा.

जाउदे... तसे ही आता, ही आग का असावी ?
मनात पेटला वणवा अन आस का विझावी ?????

1 comment:

सखी said...

जाउदे... तसे ही आता, ही आग का असावी ?
असा प्रश्न पडतो खरा आणि ती विझतही नसते हे ही खरं..