आपल्या सहचराशी आपले पटेनासे होते आणी मग एक दिवस आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतो. एक मेकांपासून बराच काळ वेगळे राहेल्यावर अचानक काही काळाने आपल्याला त्यांच्यातले गूण दिसू लागतात, ति व्यक्ती मग हवी हवीशी आणी जवळ असावी असं वाटू लागतं, बर्याच वेळी याची परीणीती त्या व्यक्तीला गमावल्याच्या पश्चात्तापात होते. मूळात गमतिशीर सत्य बर्याच जणांच्या लक्शात येत नाही. ति व्यक्ती जोवर आपल्या आयूश्यात असते तोवर आपल्याला हे गूण का दिसत नाहीत? हे गूण तेव्हाच दिसले असते तर आपण बहूदा त्या व्यक्तीला गमावले नसते! मग ते तेव्हा कूठे लपून बसले होते? या आणी अश्या कित्येक प्रश्नांची भेंडोळी डोक्यात जमू लागतात. शेवटी हे आपलं कमनशीबच! आपण माणूस ओळखूच शकत नाही, किंवा आपल्याला माणसांची किंमतच नाही! ही अथवा तत्सम बिरूदे आपण स्वतःला लाउन, सेल्फ पिटी या सहाजीक रस्त्यावर स्वतःला झोकून देतो. पण ही खरच या प्रश्नांची उत्तरे असतात का?
वास्तवात त्या व्यक्ती बरोबर काढलेला दिवस न दिवस आठवला तर तूम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज मीळू शकतात. त्या व्यक्तीतले हे सूप्त गूण आपल्याला जाणवत असतात आणी म्हणूनच आपण त्या व्यक्तीच्या जवळ जातो, किंवा त्या व्यक्तीला आपल्या जवळ येउन देतो. मग काही दिवसांनी आपण खूप जवळ आल्यावर आपण त्यांना आपल्या आयूश्याचा नकळत एक हिस्सा बनवून घेतो. हि व्यक्ती आयूश्यात येइ पर्यंत सारं काही आपलं आपल्या मर्जी प्रमाणे चाललेलं असतं. त्यात कोणाचाही भौतीक किव्वा वैचारीक हस्तक्शेप नसतो. मग हळू हळू आपण त्या व्यक्तीला वैचारीक पातळीवर consider करू लागतो. त्यांच्या विचारांचा ताळमेळ आपणच आपल्या विचारांशी घालू लागतो. आणी इथेच सारी गफलत होते. तूमच्या विचारांत बदल करण्याच्या पासपोर्ट्बरोबर ति व्यक्ती तूमच्या आयूश्यातल्या महत्वाच्या निर्णयांत हस्तक्शेप करण्याचा व्हिसा मिळ्वते. आणी मग भौतीक असो वा वैचारीक असो, सर्व पातळीवर स्वैर संचार करू लागते. त्या व्यक्तीच्या प्रतिभेने झाकोळले जाउन आपणही हा सोहळा कौतूकाने पाहातो, त्याचा आनंदही घेतो, पण नव्याचे नउ दिवस संपले की मात्र हिच प्रतीभा बोचू लागते.आपल्या आत्म केंद्री आयूश्यातला हा हस्तक्शेप आपल्याला आपल्या स्व पासून दूर घेउन जाइल का या भीतीने आपण त्या व्यक्तीच्या हातात दिलेला पास पोर्ट परत घेउ पाहातो. ते शक्य झाले नाही कि आपणच त्या व्यक्तीतील बारीक बारीक चूका काढू लागतो! आणी हे सारे इतके नकळत होते, कि आपल्याला जिवापाड प्रेम, आदर असणारी ति व्यक्ती अचानक आपल्या साठी एक शत्रू बनून बसते. मग वाद वाढतात, मतभेद दूणावतात, आणी शेवटी या सर्वाचा शेवट एकमेकांपासून दूर होण्यात होतो.
मग पून्हा आपल्या आयूश्याची व्यवधाने आपल्या हातात येतात आणी आपण काहीच काळात या स्थीत्यंतरातून सावरतो. मग आपण गेल्या परिस्थीचा त्रयस्थ म्हणून विचार करू लागतो. तोवर दूःखर्या जखमा बर्या झालेल्या असतात, स्वाभीमावरची सूज आटोक्यात आलेली असते. मग आपण क्शमाशील होतो. गेलेल्या काळाकडे तिर्हाइताच्या नजरेने पाहू लागतो, त्यातिल दूःख परदूःखा सारखे शितल वाटू लागते. तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीतले गूण दिसू लागतात आणी पश्चात्तापाची भावना मनात येउ लागते.
मूळात प्रश्न इथे संपतच नाही. प्रश्न इथून चालू होतात. कोणाला आपल्या आयूश्याच किती व्यवधान देउ करायच हा यक्श प्रश्न ज्याला सोडवता आला नाही त्याला इतरांतल्या गूणांना मूकावेच लागणार! नाहीतर जन्मभर मान तूकवून त्यांच्या कर्तूत्ववान छायेत जगावे लागणार! हा निर्णय सर्वस्वी तूमच्याच हातात असतो. त्या निर्णयाचं व्यवधान यावं लागतं, ते एकदा मिळालं की सगळे प्रश्न आपोआप सूटतात, कोणताही पश्चात्ताप मागे न ठेवता.
कोणीतरी फार छान लीहून गेलं
We fall In love with personality but marry with a character.
3 comments:
ललित लेख छान लिहतेस !(एक ढोबळ अंदाज)
This is really amazing.. and so true..
Great!!!!!!!!!!
like it Its true :)
Post a Comment