Tuesday, June 29, 2010

वेडी

अंधारली जेव्हा धरा काळवडले नभ
वेडीपीशी झाली राधा आठवणीत बघ

तिला दिसे तिचा कान्हा जिथे जाइ द्रूष्टी
सावळाच झाले जग सावळीच स्रूष्टी

साद घाली कन्हयाला कानी पडे कान्हा
सावळाच गंध माती, तोच गंध राना

आसूसली बावरली कानी येइना पावा
तिचे दू:ख ऐकेना, साद घाली रावा

अश्रू डोळा आशा मनी वनोवनी फिरे
खरचट्ली कोमल काया, पदी रक्त झरे

विरहात झूरली ति बावरली राधा
कान्हयावर जिचा जिव, तिचा जन्म नाही साधा........

Sunday, June 6, 2010

त्याला झोप येत नव्हती म्हणून ...... :D

सांज निजली मधाळले आभाळ
वार्या सवे आठवांचे ओले झाले आधर,
थेंबातून बरसली माझी वेडी आशा
आशय घन झाला मग मोकळा अंधार.

हळू हळू पदरव पाण्यावर उमटले
विसावली निशा हळूच तूझ्या कवेत
चांद गारवा मग विरून गेला,
पहाटेच्या मूग्ध हवेत........

:)

Tuesday, June 1, 2010

पाउस....

तो मला त्याच दिवशी का भेट्ला कोण जाणे, पण त्या दिवशी पहीला पाउस पडला! पावसात चींब भीजताना मी डोळे बंद केले आणी ते उघले तेव्हा तो एका लहानशा छत्रीत मावण्याचा प्रयत्न करत माझ्या समोर उभा होता. उंच, नाकी डोळी निट्स पण जरा बोजड शरीराचा तो, पावसात भिजणार्यातला नव्हता! मुंबैच्या वार्यात माणूस कीतीही प्रयत्न केले तरी भीजतोच, हे माहीत असूनही स्वत:ला छत्रीत माववण्याचा त्याचा निश्फळा प्रयत्न जाम गोड होता! वार्या बरोबर उड्णार्या पाण्याचे थेंब त्याच्या चश्म्यावर साठले होते आणी त्याच्या लांब नाका वरून पाण्याचा थेंब खाली ठीबणार होता, चश्म्यातून दिसाव म्हणून बारीक डोळे करून पाहाणारा तो एकटक माझ्याकडे पाहात होता. मला दोन क्शण पट्कन जाउन त्याच्या नाकावरच्या तो थेंब वेचावासा वाट्ला, म्हणून मी पूढे गेले, तर तो बाचकला. इतक्या वेळ धीटाइने माझ्यकडे एकटक पाहाणारा तो पटकन लाजला. मला फारच गम्मत वाट्ली, माझे हात त्याच्या कंबरेभोवती आपोआप फीरले, हातातली छत्री दोन्ही हाताने घट्ट पकड्त त्याने स्वत:ची भीती दडपण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आलो होतो, त्याच्या तोंडावरची आश्चर्य यूक्त भीती मला स्पश्ट दिसत होती. त्याने मला हसू आलं, आणी मग फायनली त्याच्या चेहर्यावरही हसू उमट्ल! त्याच्या गूलाबी गोर्या गालावरची खळी ओठाने टिपण्याची इच्छा मी आवरली पण पट्कन त्याच्या नाकावचा थेंब बोटावर झेलला. आम्ही वेड्यासारखे एकमेकांच्या डोळ्यात बघत उभे राहीलो!

मग कधीतरी छत्री उलटी झाली, बाजूने जाणार्या गाडीने आमच्यावर साचलेलं पाणी उड्वलं, पाउस आणखीन वाढला..... आणी आम्ही प्रेमात पडलो.

जाता जाता त्याने पाठी वळून विचारलं,
"हे सगळं ठीक आहे! पण तूझ नाव काय?"
मी हसून उत्तरले
"चातक!"
:D