Tuesday, July 27, 2010

काळोख

श्रावण साकळला थिजून गेल्या सरी, माझेच मन जाहले माझीया मनाचा अरि

उद्वेग भावना उडून गेल्या सार्या, अव्यक्त भावनांचा काळोख, पडला वारा

वाहात गेला सूर मनाचा दूर , नभ आक्रंदले अन डॊळी आल्या धारा

आठवणीचा वायू वेग थांबला, जिव भरारा वार्यावर लांबला

सोडलीस थोडी तयातच वेडी आशा, वारा आला,ती ही घेउन गेला

निशब्द मनाचा झाकोळला अंधार, वार्यावर फड्फडतो क्शिण दीन श्रूंगार

ह्या भकास सौदर्याच्या लेउअन चिंध्या, उधळण्या निघाले अंतरंग अंधार

सूर्यापरी झाकोळली स्वप्ने, अनं प्रारब्ध डागाळून गेले

वादळात विझली वात , निरांजन उलथून गेले……

Thursday, July 8, 2010

जाता जाता??

आज माझ्या सूट्टीचा शेवट्चा दिवस! पूण्यातून निघता पाय निघत नव्हता, काही अविचारी निर्णय बर्याचश्या जबाबदार्या मागे सोडून हक्काने कूठेतरी पळून जायच तर पूण्यासारखं दूसरं शहर नाही! आपलीच लोकं. आपलेपणा, प्रेम, सारं काही हक्काने देणारं एकमेव ठिकाण पूणं!
या वेळी येताना काहीच विचार नं करता बॅगेत काही वस्तू भरल्या आणी अकाउंट मध्ये उरलेले पैसे काढून मी पूण्यनगरी कडे धाव घेतली. मनात बरच काही होतं पण विचार करण्याची इच्छा आणी ताकद दोन्ही संपलं होतं. मती सून्न झाली होती. पावसाचे दिवस! मूंबैतून शिवनेरीत चढे पर्यंत चिंब भिजले, शिवनेरीतला कूडकूडाट सह्य होइ पर्यंत बसने संह्याद्री गाठला होता, बाहेर निसर्ग बहरून आला होता, डोंगरावर उतरलेले ढग, हिरविगार शिखरे पाहून मनाची मरगळ कूठच्या कूठे गेली, बर्याच गोश्टी उलगडत नव्हत्या परंतू त्यांच्या कडे बघण्याची फूरसतच मिळाली नाही. वाकडला बस थांबली, आमची बोचकी गाडीतून खाली टाकून बस निघून गेली. आभाळ राखाडी झांलं होतं. इतक्यावेळ बंद शितपेटीत बसलेला माझा जिव बाहेरची हवा लागताच आनंदला, आणी मग घरापर्यंतच्या रिक्शा प्रवासाने ’आपण पूण्यात आला आहात’ याची पूरेपूर जाणीव करून दिली. रिक्शाच्या भाड्यागणती पूणंही बरच बदललं होतं! घराची बेल वाजवली आणी मग मात्र सगळ्या जून्या आठवणींनी माझ्या बाजूला कोंडाळ केलं!
मित्र परिवाराला ’परिवार’ असं का म्हणतात हे जर कधी बघायचं असेल तर कधीतरी आमच्या बरोबर या! वयोगट ही बाब आमच्या साठी कधीच लागू पडणार नाही, आमच्या सगळ्याचं वय एकच आहे, ’धमाल’ वय! मला कधी माझ्या गरजा, दू:ख इथे बोलून दाखवावी लागत नाहीत ति जाणंली जातात! जिवाभावाचे मित्र म्हणजे आणखीन काय असतं? मग मनातल्या विचारांना मी नवव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं आणी, मनमोकळेपणे सिंहगड गाठला, पूढचे दिवसं सरसर गेले, फूट्बॊल मॅच, जॅम सेशन, शिवास रिगल,मूलगी बघायचा कार्यक्रम(?), रावभाजी, रिक्शाचं भाडं, हिरवा निसर्ग, इंटरनेट, मार्झोरिन आणी बरच काही.... पक्या, सहा दिवस संपले रे! :) :(
मूंबैला जायला बॅग भरवत नव्हती, घरभर पसरलेलं सामान गोळा करावसं वाट्तच नव्हतं, पून्हा मूंबइ! पून्हा तेच चेहरे, पून्हा तेच पॊब्लेम्स! कूठे पूण्याची थंड हवा आणी कूठे मूंबइतला चिकचिकाट! कूठे आपलेपणाचा ओलावा आणी कूठे क्रूत्रीम भावना! सगळीच विचारांची भेंडोळी गूतवळा सारखी मनाच्या कोपर्यात साठू लागली. एक क्शणात झाडून टाकावित असं म्हट्लं तरी झाडूत अड्कणारी आणी प्रचंड मानसिक त्रास देणारी बोचर्या विचारांची भेंडोळी.....उद्या पहाटेची बसं, मूबैत रश अवर ला पोहोचणार, आणी मग तिच हॊर्न्स ची मरगळ, डूचमळणार्या बस ची मळमळ, घाम, प्रदूशण, चेंबूर, सायन, दादर, टॅक्सी....चेहरे....... पक्या परत कधी जायच पूण्याला?.......... :(