श्रावण साकळला थिजून गेल्या सरी, माझेच मन जाहले माझीया मनाचा अरि
उद्वेग भावना उडून गेल्या सार्या, अव्यक्त भावनांचा काळोख, पडला वारा
वाहात गेला सूर मनाचा दूर , नभ आक्रंदले अन डॊळी आल्या धारा
आठवणीचा वायू वेग थांबला, जिव भरारा वार्यावर लांबला
सोडलीस थोडी तयातच वेडी आशा, वारा आला,ती ही घेउन गेला
ह्या भकास सौदर्याच्या लेउअन चिंध्या, उधळण्या निघाले अंतरंग अंधार
सूर्यापरी झाकोळली स्वप्ने, अनं प्रारब्ध डागाळून गेले
वादळात विझली वात , निरांजन उलथून गेले……
4 comments:
स्तब्ध निरंतन आता होते उरले, तेंव्हा प्रतीबिम्बाची चाहूल येते
आरश्यात ज्यापरी होतो वाम उजवा, इथे कल्लोळ तिथे मोकळ्या वाटा
निरपेक्ष मनाची उधळण पाहून त्याच्या, अव्यक्त भावनांचे सावट खुलते
आठवणींच्या अग्निरथास आता दिसती नूतन स्थाने, अन हास्यशृंगाराने मन गुणगुणे गाणे
मग वारा शिळ घालून देई मम गाण्याला साथ, आणि सूर्य जोपासी नाव आशांचे रोप
I know what I have written, is very naive, but tried to write what I felt immediately after reading your poem.
You have written, really well. I loved it. Keep it up. :)
@Shalmali...you are one of the very few poets I know who expresses in powerful intense words yet beautiful and ornamental form...you are very talented...your poetry is of type that will be read hundred years from now as classics...keep up the good work :)
अगं तुला खो दिलाय.. नक्की काय करायचं वगैरे ते तुला इथे कळेल :)
लिही पटकन..
http://samvedg.blogspot.com/2010/07/blog-post.html
Post a Comment