Tuesday, June 23, 2009

rain rain......

बरोबर १० महिन्या पूर्वीची गोश्ट आहे. हाच दिवस होता तो ......
मन अवखळ झाल होतं .. मुंबईतील सरता अवखळ पाउस.. मन पुन्हा एकदा १६ वर्शांच झालं होतं..
स्वप्नांना पंख फुटले होते.... पायातल्या बेड्या आपो आप गळून पडव्यात तस काहिस झालं होतं. महत्वाकांशेचे क्शितीज रूदावलं होतं. सरं काही मुठीत आलय अस वाटू लागलेल......रुतू तोच.... भावना तीच.... दीवसही तोच.. मग आज या पंखांना निराशेची किनार का? आज या स्वप्नांना अश्रूंचा ओलावा का??

rain rain come again.....
wash away all the pain....

Tuesday, March 24, 2009

आठवण

नाही येत मला दडपता आलेली तुझी आठवण,
अन विसरून जाता तुझ्या सारख सारं काही पटकन

मग म्हणूदेत मला ते कमकुवत मनाने
जागते ठेवते मी, प्रेम निखार्यात धिराने.

वाळू टाकून विझवू पाहात नाही मी मन वणवा तव आठवणींचा
विझतो विखार माझ्या धूमसत्या तारुण्याचा.

जाउदे... तसे ही आता, ही आग का असावी ?
मनात पेटला वणवा अन आस का विझावी ?????

Monday, March 2, 2009

आठवण तुझ्या जाणत्या स्पर्षाची
आठवण तुझ्या स्निग्ध अधरांची

आठवण तुझ्या आसक्त बाहुंची
आठवण तुझ्या मंद स्मीताची

आठवण तुझ्या लयकार स्पंदनांची
तुझ्या बाहूंतल्या त्या धुंद क्शणांची..............................


शाल्मली :)

Tuesday, January 27, 2009

अंत

ह्रुदयातील हे रूधीर जाहले मुक्त
सुटले शोधण्या मार्ग आसक्त
भळभळून मिळाले जीवनास
विसरून त्यास ते रक्त

जखनेतून झाला मोकळा विशारी लाव्हा
लपलपून पिती त्यास सागरी जिव्हा

खार झोम्बतो खाचेवर शरीराच्या
अन डाच मागतो थेट ठाव ह्रुदयाचा

किती दुधारी घाव दीलेस तु ह्रुदया
पण एकच गेला दुभंगून हि काया

या रक्त सागरी देह आहूती देउन
मी तुझ्याच अंशा मध्ये बुडून जाइन

संपेल रूधीर आणी सागर श्वास नेइल
तरी तुझ्या आठवणी ह्रुदयात जिवंत असतील
विशारी रक्त वाहूनी गेले जरी शरिरातील सारे
तरी सागर त्यांना ओलावत ठेलील

रूधीर वाहूनी गेले जरी सारे
ह्रुदयात तुला जिवन जागते ठेवील............

Thursday, December 4, 2008

माणूस

मुंगीलाही अभय नाही, तीला खातो कोळी.

कोळ्यालाही अभय नाही, त्याला खाई पाल.

पलीलाही अभय नाही, पाल खाई मांजर.

मांजरालाही अभय नाही, तीला घाबरवी कुत्रा.

कुत्र्यालाही अभय नाही, त्याचा मालक माणूस.

सर्वां वरती असलेल्या या मानवास कसली भिती?

तरीही माणूस निर्भय नाही, तो घाबरवी एकमेकांस.

Thursday, September 4, 2008

हूरहूर

नभात घन भरून आले
मनी उठले काहूर ओले
तना-मनातून चित्त भिजले
आठवणीत सर्वस्व न्हाले ।

अश्याच पाउस वादळ वाटेत
तुझ्याच हातात होता हा हात
कुठे बिनसली प्रबळ ती साथ?
कुठल्या गर्तेत हरवली वाट ।

जन्म जन्मांचा साथ आपुला
काही क्शणांचा सोबती राहीला
शरीरा मधील प्राण तेवला
अशीच कळ लागली जिवाला।

कुठे संपले सप्तक स्वर...
कुठे विसावले मंद्र नी तार....
कुठे जाहला आर्त मल्हार....
का लावलीस मना हूरहूर.....

Tuesday, June 3, 2008

F S I

काव काव करत कवळा बसला घराच्या खीडकी वर,
आत बघून मला म्हणतो राव तुम्हाला सुंदर घर!

आम्ही आपले उन्हा तान्हात भटकत फीरतो दारो दार,
पावसाळा येण्या आधी काड्या शोधतो वारंवार.

तुमच काय बर आहे बुवा तुमच्या डोक्यावर छप्पर
पाउस पडो वारा सुटो तरी तुमच्या तंगड्या वर !

आम्ही बीचारे तंगड्या भाजत फीरत असतो उन्हा तन्हात
नशीब आमचच खट्टू , तुम्हाला घर मीळतं बाजारात.

आहो भाउ ऐकलत का ह्या हजार स्क्वेअरफीटाच्या घरात,
कशाला देता हकलवून जर आलो अर्ध्या मुर्ध्या स्क्वेअरफीटात?

तुम्हा साल्या माणसांची दानतच गेलीय वीकत
काय जाणार आहे जर दीलीत जागा घरट्या साठी फुकट?

शांत पणे ऐकत होतो गंभीर पणे उठत म्हटल
कावळे बुवा तुमचं मला बघा बरीक पटलं!

देउ केला तुम्हाला मी अर्धा स्क्वेअरफीट
पण सांगू का कींमत याची येइल तुम्हाला येइल तुम्हाला फीट.

पहीला टाका advance ह्जार भराचा , मग तुम्चा E M I दोन हजाराचा
एकूण मीळुन जागा पडेल आठ हजाराला, असतील इतके पैसे तर आणतो एजंटला.

नसतील पैसे खीशात तर लवकरच नीघा
दादरचा वीचार सोडा, म्हाडात जागा बघा!